‘हत्ती’ने असा ओलांडला रेल्वे रुळ…पाहा व्हिडीओ

1238

रेल्वे रूळ ओलांडताना एक हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक हत्तीच्या कृतीचे कौतुक करत आहे. तर काही लोक वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.

व्हिडीओत हा हत्ती रेल्वे रूळ गेटसमोर उभा असल्याचे दिसत आहे. रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी तो हळूहळू गेट वर उचलतो. मात्र गेट पुन्हा खाली येते. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर तो गेट पूर्ण वरती उचलून एका बाजूने निघून जाताना दिसत आहे. हा हत्ती रेल्वे रूळ ओलांडत असताना सुदैवाने तिथून कोणती रेल्वे गेली नसल्याने कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही.

या व्हिडीओला शेअर करताना सुशांत नंदा यांनी लिहिलं आहे की, ‘लेव्हल क्रॉसिंग किंवा रेल्वे रूळ या हत्तीला दुसर्‍या बाजूने जाण्यास रोखू शकली नाही. हत्ती आपला मार्ग चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात, जी एक कला असून ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. विशेष म्हणजे हत्तीने दोन्ही टोकांवरुन जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या.’

आपली प्रतिक्रिया द्या