विराट-अनुष्काच्या लग्नाची दोन वर्ष पूर्ण, ‘अनसीन’ फोटो केले शेअर

648

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी दोन वर्षापूर्वी 11 डिसेंबर, 2017 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर काही अनसीन फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने सोशल मीडियावर विराटसोबतचा लग्नातील ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे तुम्ही त्याच्यात इश्वराचा चेहरा पाहता. प्रेमाबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही फक्त एक भावना नाही, तर त्यापेक्षाही खूप काही आहे. प्रेम हे एक आपल्याला सत्याचा मार्ग दाखवते आणि ते मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजते, असे कॅप्शन अनुष्काने या फोटोसोबत शेअर केले आहे.

अनुष्काप्रमाणे विराट कोहली याने देखील लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त अनुष्कासोबतचा लग्नातील सुंदर फोटो शेअर केला आहे. खरे पाहिले तर तुमच्या आयुष्यात फक्त प्रेम आहे आणि बाकी काही नाही. जेव्हा इश्वर तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती पाठवते ज्यामुळे तुम्हाला याची (प्रेम) रोजच अनुभुती होते, त्यावेळी यासाठी एकच शब्द परिपूर्ण आहे तो म्हणजे ‘कृतज्ञता’, असे कॅप्शन विराटने दिले आहे.

इटलीत लग्न
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर, 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. या लग्नसोहळ्यामध्ये अत्यंत जवळचे मित्र आणि कुटुंबिय सहभागी झाले होते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या विरुष्काने हनिमूनचे फोटो शेअर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या