फ्री हीट,  प्रेक्षकांच्या वतीने कोहलीने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान वेगळाच विराट कोहली बघायला मिळाला. कर्णधार कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथची प्रेक्षकांकडून हुर्यो उडवली जात होती. अखेर कोहलीनेच पुढाकार घेत प्रेक्षकांना खडसावले आणि त्यांना स्मिथसाठी टाळ्या वाजकण्याचा इशारा केला. यानंतर कोहलीने स्मिथची माफीदेखील मागितली. कोहलीच्या या कृतीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोहली म्हणाला, जे घडलंय त्याला खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्याकर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे. मैदानात हिंदुस्थानी प्रेक्षकांची संख्या जास्त होती. स्मिथने काहीच चुकीचे केले नव्हते ज्यासाठी त्याची हुर्यो उडवली पाहिजे. हिंदुस्थानी प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते हे पाहून मलाच वाईट काटले. म्हणूनच मी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी मागितली, असे कोहलीने सांगितले.