किती येतील, किती जातील, पण…; युवीच्या निवृत्तीवर सेहवागची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॅन्सरची झुंज सुरु असतानाही आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत देशासाठी दणदणीत कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सोमवारी युवराजने निवृत्तीची घोषणा केली आणि 19 वर्षापासून सुरू असलेल्या विस्फोटक कामगिरीला ब्रेक लागला.

वर्ल्डकप 2019 : यष्ट्यांवरील बेल्सचे ‘चिपको’ आंदोलन

युवराजने 2007 चा टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या एक दिवसीय वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी नोंदवली होती. युवराजने हिंदुस्थानच्या क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग यासारख्या दिग्गज खेळाडूंसोबत कारकीर्द सजवली. युवराजने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर केलेल्या खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. टीम इंडियाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने युवराजसोबत एक फोटो शेअर करून भावूक पोस्ट लिहिली आहे.

निवृत्तीनंतर युवराज भविष्यात काय करणार?

क्रिकेटमध्ये कितीतरी खेळाडू येतील आणि जातील. पण युवराजसारखा खेळाडू सापडणे अत्यंत कठीण आहे. त्याच्या आयुष्यामध्य़े अनेक कठीण प्रसंग आले, पण त्याने गोलंदाज व आजाराला ठोकून काढले आणि चाहत्यांची मनं जिंकली. त्याच्या या झुंजार प्रवासामुळे आणि इच्छाशक्तीमुळे त्याने अनेकांना प्रोत्साहन दिले. युवराज, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असे ट्वीट सेहवागने केले आहे.