कोरोनाला अटकाव करणार ‘व्हायरस अटेन्यूएशन डिव्हाईस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना विषाणू संसर्गापासून कर्मचारी वर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेक कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पर्यायाचा वापर करत आहेत. बंगळुरू येथील शायकॉकन कॉर्पेरेशनने मुंबईतील तीन कार्यालयांत 30 व्हायरस अटेन्यूएशन डिव्हाईस बसवली आहेत.

हे उपकरण भिंतीवर सहज लावता येणारे असून त्याला शायकॉकन म्हणतात. कोरोना विषाणू आणि एन्फ्ल्यूएन्झा समूहातील विषाणूंपासून कंपनीच्या 250 हून अधिक कर्मचाऱयांचा बचाव करण्यात हे उपकरण उपयुक्त ठरते तसेच  कार्यालयीन परिसरात कोरोना संसर्ग होण्यापासून आळा बसतो. ही उपकरणे बसवल्यानंतर कार्यालयात प्रादुर्भावाची कोणतीही केस आढळली नाही, असे  फिनाकस सोल्यूशन्सचे अश्विन अय्यपन यांनी म्हटले आहे.