दानवेंनी हिंदू समाजाची माफी मागावी, विहिंपची मागणी

1173

राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू आहे. असे असतानाच केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी गोवंश हत्येस समर्थन दिल्यामुळे हिंदू बांधवांमध्ये देशभरात संताप व्यक्त होत आहे. रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर असून त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

Video – मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, रावसाहेब दानवे यांचा हिरवा बाणा

 भोकरदनमधील मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात दानवे यांनी जोरदार भाषणही दिले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले दानवे यांनी गोवंश बंदी कायदा करण्यात आला तेव्हाचे उदाहरण दिले. दानवे म्हणाले, ‘जब पहिली बार गोवंश हत्या बंदी हो गई और बकरी इद आ गई तुम्हारी, तब कुर्बानी के लिए ये दो-चार लडके मेरे पास आये. बोले साब ये क्या किया, अब हमने क्या खाना? मैने पुछा क्या हुआ. वो बोले वो काटने देते नही. मैने कहाँ जबतक रावसाहब दानवे है, काटना बंद नही होगा तुम्हारा.’ ।

रावसाहेब दानवे स्वतः मंत्री असताना त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे हे त्यांच्या पद प्रतिष्ठेस शोभणारे नाही असे मत विहिंपने व्यक्त्केले आहे. हे वक्तव्य बेकायदेशीर व पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या विरोधात असल्याचेही विहिंपने  म्हटले आहे. गोवंश हत्या बंदीच्या विरोधात त्यांच्या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या