
विमान प्रवासातील वायफाय सुविधेमुळे प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे. केंद्र सरकारने मार्चमध्ये दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने विस्तारा एअरलाइन्सने शुक्रवारपासून मोफत वायफाय सेवा देण्याची घोषणा केली. बोइंग 787-9 ड्रीमलाइनरच्या उड्डाणात ही सेवा उपलब्ध केली आहे. सध्या दिल्ली-लंडन मार्गावरील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेमुळे विमान प्रवाशांच्या फेसबुक, ट्विटरला जणू काऱयाचा वेग मिळणार आहे.
n विमान प्रवासात मोफत कायफाय पुरवणारीविस्तारा ही पहिली हिंदुस्थानी एअरलाइन्स ठरली आहे. लवकरच विस्तारा एअरलाईन्सच्या सर्व प्रवाशांना मोफत वायफायची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे एअरलाईन्सतर्फे स्पष्ट करण्यात आले. विशिष्ट कालावधीतील मोफत सेवेबाबत प्रवाशांकडून येणाऱया प्रतिक्रियांच्या आधारे ही सेवा अधिक प्रभावी बनवली जाईल. सिस्टमची वर्किंग कॅपॅसिटी लक्षात घेऊन सुविधेचा विस्तार केला जाईल, तसेच पुढील काही दिवसांत टॅरिफ योजनांची घोषणा केली जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. या सुविधेमुळे प्रवाशांना फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंगचा प्रवासात मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
























































