
मिग-29 या लढाऊ विमानाचे पायलट एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज हिंदुस्थानी हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.
41 वर्षाहून अधिक सेवा करणारे मावळते हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया यांच्याकडून चौधरी यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. विवेक चौधरी हे हवाई दलाचे 27 के प्रमुख आहेत. विशेष म्हणजे विवेक चौधरी हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि वायू सेना पदक मिळाले आहे.



























































