आता Gmail मध्ये मिळणार व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लवकरच Gmail मध्ये नवीन अपडेट दिले जाणार आहे. नवीन अपडेटनंतर वापरकर्ते Gmail द्वारे व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकतील. गुगल यासाठी Gmail पुन्हा डिझाइन करत आहे. कंपनी आपल्या अॅपमध्ये अधिक वर्कस्पेस फीचर्स असावे म्हणून हे अपडेट करत आहे.

Gmail चा वापर करून वापरकर्ते आताही आपल्या संपर्कांना व्हिडीओ कॉल करू शकतात, मात्र यासाठी त्यांना गुगल मीट अॅपची मदत घ्यावी लागते. नवीन अपडेटनंतर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फक्त Gmail च्या अॅपद्वारे करता येईल.

कंपनी Gmail ला ऑफिस वापरासाठी अधिक उपयुक्त बनवत आहे. Gmail हे ऑफिसशी संबंधित सर्व अॅप्लिकेशनसाठी सेंट्रल हब व्हावे, अशी कंपनीची इच्छा आहे. याद्वारे, मेल पाठवणे / प्राप्त करणे, वैयक्तिक आणि ग्रुप चॅट्स , व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा आधीच उपलब्ध होती. आता यात व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सेवाही दिली जाणार आहे. यामुळे वापरकर्त्यांच्या सर्व गरजा Gmail मध्येच पूर्ण होतील.