ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात काँग्रेसला मतदान करा, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेऊन सात महिने झाले. असे असले तरी शिंदे आपल्या जुन्या पक्षाला विसरले नाहीत. मध्य प्रदेशच्या एका सभेत त्यांनी चुकून काँग्रेसचे बटन दाबा असे आवाहन केले.

मध्य प्रदेशमध्ये 27 जागांसाठी पोटनिवडणूक आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण या पोटनिवडणुकीवरच सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे एका सभेत भाषण देत होते. या भाषणाच्या वेळी त्यांनी चुकून भाजप ऐवजी काँग्रेसल मतदान करा असे म्हटले.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की येत्या तीन तारखेला काँग्रेसचे चिन्ह हातासमोरील बटण दाबा, असे म्हणताच शिंदे यांची चुक लक्षात आली त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.