
सामना प्रतिनिधी । दहिसर
महाराष्ट्रात ऍथलेटिक्समध्ये अग्रेसर असलेल्या व्हीपीएम स्पोर्टस् क्लब, दहिसरचे 29 वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी विद्या मंदिर, दहिसर शाळेच्या पटांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सन 2018-19 रोजी झालेल्या खेलो इंडिया, विविध राष्ट्रीय स्पर्धांत, तसेच राज्यस्तरीय स्पर्धांतील पदक विजेता क्लबच्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. या संमेलनात क्लबचे खेळाडू सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.




























































