व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबला जेतेपद

पोयसर जिमखाना-उत्तर मुंबई क्रीडा महोत्सवात मुंबई उपनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने कांदिवली, पोयसर जिमखाना क्रीडा संकुलात खुल्या अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. दहिसरच्या व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेत एकूण 335 गुण मिळवले. ओव्हर-ऑल चॅम्पियनशिप आणि त्यांचे स्टार परफॉर्मर्स, ऋषिका शेट्टी (महिला) आणि खुश शाह (पुरुष), ज्यांना वैयक्तिक चॅम्पियन म्हणून गौरविण्यात आले.

ट्रक अॅण्ड फिल्डर मास्टरच्या प्रेक्षा कोलतेने स्प्रिंटमध्ये तिहेरी सुवर्णपदक पटकावले. प्रेक्षाने 16 वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर आणि 400  मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले.