
‘महागुरू’ राहुल द्रविड यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवल्यावर आता टीम इंडियाचे माजी धडाकेबाज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण आता नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असणार आहेत. यापूर्वी हे पद राहुल द्रविड यांच्याकडे होते. द्रविड यांची हिंदुस्थानी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. यापूर्वी हा पदभार स्वीकारण्यास व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नकार दिला होता. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी त्यांचे मन वळवून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.



























































