गणपतीपुळ्यात भिंत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे.गणपतीपुळे येथील मंदिराच्या आवारातील प्रसादाच्या दुकानाच्या समोरची भिंत आज दुपारी कोसळली.तसेच गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरीलही भिंत कोसळली आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी तालुक्याला बसला असून 24 तासात 212 मिमी पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसामुळे रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.