
वरळी परिसरात रस्ते, पदपथ, उद्याने, विविध पायाभूत सुविधा, शाळा आणि इतर विकासकामांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडून येतो आहे. त्यामध्ये वरळी रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणाची भर पडली आहे. 10 मीटर शूटिंग रेंज उपलब्ध असून आता लवकरच 25 आणि 50 मीटर रेंजदेखील उपलब्ध केली जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्राचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचेल, असा विश्वास राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
वरळीमध्ये जे. के. कपूर चौकाजवळ रायफल रेंज येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन संचलित शूटिंग प्रशिक्षण पेंद्र आहे. या केंद्रात मुंबई महापालिकेने नूतनीकरण केलेल्या 10 मीटर शूटिंग रेंजचे लोकार्पण राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या जागेवर संचलित या रायफल रेंजमधील विविध रेंजचे नूतनीकरण गेली काही वर्षे प्रस्तावित होते. त्यापैकी 10 मीटर रेंजचे नूतनीकरण महापालिकेने पूर्ण केले आहे. या शूटिंग रेंजच्या जागेत नव्याने बनवलेले छत, विद्युत प्रकाशयोजना यासह रेंजसाठी आवश्यक सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकानुसार केलेल्या आहेत.
वरळी रायफल रेंजला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार
अशोक पंडित, अंजली भागवत, सुमा शिरूर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी या नेमबाजी पेंद्रातून धडे गिरवले आहेत. आता 25 आणि 50 मीटर रायफल रेंजचे नूतनीकरण हाती घेणार असून त्यामुळे वरळी रायफल रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण पेंद्र म्हणून नावाजले जाईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. क्रीडापटूंसह पोलिसांनादेखील प्रशिक्षणासाठी या पेंद्राचा मोठा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, महासचिव शीला कानुगो, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, शिवसेना उपनेते सचिन अहिर, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

























































