
सामना ऑनलाईन । पुणे
पिपंरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या जलसाठ्यात 7.53 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 61 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच 24 तासात जलसाठ्यात 1.66 टक्के वाढ झाली आहे. तर 1 जूनपासून धरणाच्या जलसाठ्यात 7.53 टक्के वाढ झाली आहे. सध्या धरणात 20.99 टक्के जलसाठा आहे.
गेल्यावर्षी 5 जुलैपर्यंत 572 मिमी पाऊस झाला होता. तर गेल्यावर्षी धरणात 25.43 टक्के जलसाठा शिल्लक होता. लोणावळा परिसरात शुक्रवारी 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारपर्यंत 1029 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी 5 जुलैपर्यंत 1102 मिमी पाऊस झाला होता.

























































