रत्नागिरी जिल्ह्यात 40 वाड्यांमध्ये पाणी टंचाई, टँकरने पाणी पुरवठा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मे महिना सुरु होताच जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 20 गावातील 40 वाड्यांमध्ये 5 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे़. 3617 लोकं पाण्यासाठी वणवण भटकत असून हरामध्येही पाणी टंचाईची झळ बसली आहे.

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात पहिला टँकर धावू लागला़ त्यानंतर हळूहळू पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली़. खेड तालुक्यात 14 गावातील 26 वाड्यांत राहणार्‍या 2228 लोकांना टँकंरने पाणी पुरवठा सुरु आहे़. चिपळूण तालुक्यात 4 गावातील 9 वाड्यांत राहणार्‍या 798 लोकांना एका टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़. लांजा तालुक्यात 2 गावातील 5 वाड्यांत राहणार्‍या 591 लोकांना एकां टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़. पुढील आठवडाभरात टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.