घरे, गाड्या धुवू नका, महापालिकेचे फर्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लातूर

पावसाने काढता पाय घेताच राज्यात पाणीटंचाईचं संकट उभं रहायला सुरुवात झाली आहे. यावर्षी लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. लातूर महानगरपालिकेने शहरात पाणीकपात लागू केला असून शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. नवरात्र व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाणी कपात करण्यात आल्याने नागरिक संतापले आहेत.

पावसाची एक्झिट…पाणीकपातीचे संकट

लातूर महानगर पालिकेने पाणीकपातीसोबतच नागरिकांसाठी काही नियमही लागू केले आहे. नागरिकांना दुचाकी चारचाकी गाड्या तसेच घरे धुण्यास मनाई करण्यात आली आहे. या साफसफाईसाठी सर्वाधिक पाणी वाया जात असल्याने हे नियम लागू केल्याचे समजले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लातूर मनपाने दिला आहे.