मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, राज्यपालांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalyan-singh

सामना ऑनलाईन । लखनौ

आम्ही सर्व लोक भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हा सर्वांना आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे सरकार यावे आणि पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत असे वाटते अशी प्रतिक्रिया राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी अलीगड येथे बोलताना दिली. कल्याणसिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी कल्याणसिंह यांच्याकर जोरदार टीका केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसतात. परंतु कल्याणसिंह यांनी राजकीय व्यक्तीसारखे विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.