महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशभरात मॉन्सून पोहचल्याने हवामान खात्याने जाहीर केले आहे. राजधानी दिल्लीतही पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता हवामान खात्याने येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर राजधानी दिल्लीत 7 आणि 8 जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळील भाग, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात, मध्य महाराष्ट्रात 8 जुलै तर कोकण आणि गोल्यात 7 आणि 8 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पाच दिवसात मराठवाडा आणि कर्नाटकातील काही भागात गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 6 आणि 7 जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच तामिळनाडी, पद्दुचेही या ठिकाणी तुरळक पाऊस होईल. मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्येही तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 6 जुलै रोजी उत्तर प्रदेश, 4 ते 8 जुलै दरम्यान राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.