साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 जुलै ते शनिवार 31 जुलै 2021

>> नीलिमा प्रधान

मेष – नवे डावपेच गुप्त ठेवा

मेषेच्या सुखस्थानात बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. कामे करण्यात अडथळे येतील. व्यवसायात चर्चा करताना सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच गुप्त ठेवा. विरोधकांना चाहूल लागू देऊ नका. दिग्गज लोकांच्या भेटी होतील. स्पर्धा सोपी नसली तरी अशक्य नाही.
शुभ दिनांक – 25, 26

वृषभ – अनाठायी खर्च टाळा

वृषभेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. व्यवसायात खर्च वाढेल. सामाजिक कार्यात क्षुल्लक तणाव होईल. सहकारी, नेते यांच्यात गैरसमज निर्माण होतील. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत प्रगतिकारक वातावरण राहील. उत्साह वाढेल.
शुभ दिनांक – 26, 27

मिथुन – शेअर्समध्ये लाभ होईल

मिथुनेच्या धनेशात बुध राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात नवे कंत्राट मिळेल. आत्मविश्वासात भर पाडणारी घटना घडेल. शेअर्समध्ये गुंतवणुकीत लाभ होईल. दिग्गज लोकांसह अधिक चांगल्या कार्याची सुरुवात करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात अग्रणी राहाल. शुभ दिनांक – 26, 27

कर्क – वर्चस्व वाढेल

स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. उद्योगधंद्यात मनाप्रमाणे काम होईल. नवे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. जनहिताच्या कार्यात प्रगती होईल. नोकरीत वर्चस्व वाढेल.
शुभ दिनांक – 28, 29

सिंह – निर्णयात चूक नको

सिंहेच्या व्ययेषात बुध राश्यांतर, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. अहंकाराची भाषा दूर ठेवा. व्यवसायात तुमचा अंदाज चुकेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. निर्णयात चूक करू नका. नोकरीत कामाचा ताण राहील. वरिष्ठांना दुखवू नका. शुभ दिनांक – 26, 27

कन्या – मतभेद होतील

कन्येच्या एकदशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. मनावर दडपण येणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ कठीण कामाची जबाबदारी देतील. सहकारी, नेते यांच्यासोबत मतभेद होतील. व्यवसायात वाद वाढवू नका. घर, जमीन याची कामे लवकर करण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक – 28, 29

तूळ – व्यवसायात जम बसेल

तुळेच्या दशमेशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. कामात अडचणी आल्या तरी कामे पूर्ण होतील. व्यवसायात जम बसेल. उत्साह वाढेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगती कराल. चित्रपट, कला, साहित्यात मनाप्रमाणे कामे होतील.
शुभ दिनांक – 26, 27

वृश्चिक – कायद्याच्या सीमारेषा पाळा
वृश्चिकेच्या भाग्येषात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात भागीदार नवे आश्वासन देईल. सामाजिक क्षेत्रात कट, कारस्थान करण्याचा प्रयत्न होईल. तुमची दिशाभूल होणार नाही याकडे लक्ष द्या. कायद्याच्या सीमारेषा ओळखून निर्णय घ्या. नव्या परिचयातून प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक – 25, 28

धनु – कार्याला दिशा मिळेल

धनुच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. तुमच्या कार्यासाठी दिशा देण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होईल. धंद्यात फायदा होईल. मात्र चर्चा करताना ताळमेळ राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार मिळण्याचे आश्वासन मिळेल. तुमच्या कार्यावर टीका होईल. उतावळेपणा नको.
शुभ दिनांक – 26, 27

मकर – दूरदृष्टिकोनातून विचार करा

मकरेच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. दूरदृष्टिकोनातून विचार करून योजना बनवा. व्यवसायातील अडचणी दूर करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगल्या कार्याचा आरंभ होईल. प्रवासात सावध राहा. कुटुंबातील नाराजी कमी करा. मान, प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.
शुभ दिनांक – 27, 28

कुंभ – तटस्थ राहून प्रश्न सोडवा

कुंभेच्या षष्ठेशात बुध राश्यांतर, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करा. सामाजिक क्षेत्रात काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. क्षुल्लक कारणावरून तुम्हाला कमी समजण्याचा प्रयत्न विरोधक करतील. वरिष्ठांसोबत योग्य धोरण ठेवा. उत्साह वाढेल.
शुभ दिनांक – 28, 29

मीन – नोकरीत वर्चस्व राहील
मीनेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आप्तेष्ट, मित्रांसोबत मतभेद होतील. व्यवसायात तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व टिकवता येतील. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. नोकरीत कामाचे वर्चस्व राहील. मान, प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.
शुभ दिनांक – 30, 31

आपली प्रतिक्रिया द्या