
सामना ऑनलाईन । हुबळी
पश्चिम बंगालमध्ये एका मुलीने खेळता-खेळता तिच्या आईला गोळी मारल्याचं समोर आलं आहे. या विचित्र घटनेत सुदैवाने ती महिला बचावली आहे. त्या महिलेला ही पिस्तूल त्यांच्या घराबाहेरील गार्डनमधे मिळाली. ते खेळण्यातील खोटं पिस्तूल असावं या विचाराने तिने ते त्यांच्या मुलीला खेळाण्यासाठी दिलं आणि गोळी लागून ती गंभीर जखमी झाली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील हुबळीमधील रहिवासी असून १६ जूनला रविवारी ही घटना घडली. रविवारी सकाळी जेव्हा त्या त्यांच्या घराच्या बाहेरील गार्डनमध्ये गेल्या तेव्हा त्यांना एक पिस्तूल पडलेल दिसलं. ते खेळण्यांतल असावं असं समजून त्यांनी त्यांच्या मुलीला खेळण्यासाठी दिलं. खेळता–खेळता त्या पिस्तूलातून गोळी सूटली आणि थेट त्या महिलेला लागली.
दरम्यान, जखमी महिला रुग्णालयात भरती असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर महिलेची मुलगीही पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.
























































