
रेल्वे प्रवाशांना शनिवारी रात्री ‘जम्बो ब्लॉक’चा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असून विरारकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 या वेळेत बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत, विरार/वसई रोड आणि बोरीवली/गोरेगावदरम्यान सर्व अप स्लो लाईनच्या गाड्या अप फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विरारकडे जाणाऱया सर्व डाउन स्लो लाईनच्या गाड्या गोरेगाव आणि वसई रोड/विरार दरम्यान डाउन फास्ट लाईनवर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.






























































