
सामना ऑनलाईन । विरार
वसई-विरार दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवस ठप्प असलेली या मार्गावरील वाहतूक बुधवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली होती. मात्र आज दुपारी विरार रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली होती. त्यानंतर काही वेळात बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

























































