अंघोळीचा साबण लवकर संपत असेल तर… हे करून पहा

अंघोळीसाठी वापरला जाणारा साबण वेगवेगळय़ा कंपनीचा असू शकतो, परंतु बऱ्याचदा बाथरूममध्ये साबण लवकर संपतो. तुमच्या बाथरूममधील साबणसुद्धा लवकर संपत असेल तर काही सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी साबण अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी साबणावर सतत पाणी पडणार नाही. नेहमी पाण्यात असल्यामुळे साबण वेगाने वितळतो.

गरजेनुसार, कमी साबण वापरा. पावसाळय़ात बाथरूममध्ये जास्त दमटपणा असतो, ज्यामुळे साबण अधिक वितळतो. त्यामुळे पावसाळय़ात या उपायांची जास्त काळजी घ्या. साबणासाठी एक विशेष जागा ठेवा. अंघोळीसाठी वापरल्यानंतर साबण तत्काळ त्या ठिकाणी ठेवा. साबण कपडय़ात जाणार नाही याची काळजी घ्या.