
शाळेत गेल्यानंतर अनेकदा छोटय़ा मुलाच्या कपड्यांवर पेनाच्या शाईचा डाग पडतो. हा डाग कसा काढावा असा प्रश्न पडतो. परंतु हा डाग काढण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स आहेत. सर्वात आधी शर्टावर किंवा पँटवर डाग पडला असेल तर त्याला तत्काळ चोळत बसू नका. असे केल्यास डाग आणखी पसरतो.
डाग जास्त गडद असेल तर डागावर दूध ओता आणि 1-2 तास भिजू द्या. मग धुवा. 5 ते 10 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण करून ते डागावर लावा. सुकल्यानंतर धुऊन काढा. हँड सॅनिटायझर कापसावर घेऊन डागावर हळूच रगडा. कपडे नेहमी थंड पाण्याने धुवा. गरम पाणी वापरल्यास शाईचा डाग कायमस्वरूपी बसू शकतो.
































































