
1 इन्शुरन्स पॉलिसी काढल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे, परंतु काही वर्षांनंतर इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्रे गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास काय कराल.
2सर्वात आधी पॉलिसी हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा आणि एफआयआरची प्रत घ्या. डुप्लिकेट पॉलिसी मिळवण्यासाठी किंवा दावा करण्यासाठी ही प्रत आवश्यक असेल.
3 तुमच्या विमा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला कॉल करा किंवा ई-मेल करा. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा पॉलिसीधारकाचा तपशील यांसारखी माहिती तयार ठेवा.
4 जरी कागदपत्र हरवले असले तरी जोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरत आहात, तोपर्यंत तुमची पॉलिसी वैध राहते. डुप्लिकेट पॉलिसी मिळवण्यास काही वेळ लागू शकतो.
5 पॉलिसी हरवल्याने कव्हरेजवर परिणाम होत नाही, पण प्रीमियम वेळेवर भरावे. अनेक विमा कंपन्या पॉलिसीच्या डिजिटल प्रती देतात. ती डाऊनलोड करू शकता























































