
स्वतःचे घर खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी पै–पै जमा करून घर खरेदी केले जाते. तुम्ही किती वर्षांसाठी कर्ज घेतले हे महत्त्वाचे..
घर खरेदी केल्यानंतर काही महिने व्यवस्थित ईएमआय भरल्यानंतर अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे घराचा हप्ता (ईएमआय) भरणे शक्य होत नाही.
जर तुमच्या घराचा एक किंवा दोन ईएमआय थकला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. भविष्यात कर्ज मिळणे अवघड होऊन जाते.
जर घराचे ईएमआय जास्त थकले तर बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकते. बँक तुम्हाला उच्च जोखमेच्या गटात टाकू शकते.
त्यामुळे हप्ता थकला असेल तर तत्काळ बँकेशी संपर्क साधा. हप्ते का भरू शकत नाही, हे बँकेला सांगा. तुम्ही हप्ते कमी करू शकता किंवा कर्जाची मुदत वाढवू शकता.