
1 चोरीच्या प्रकरणात, मारहाणीच्या प्रकरणात किंवा अन्य कोणत्याही प्रकरणांमध्ये जर पोलीस तुमची तक्रार नोंदवून घेत नसतील तर काय कराल.
2 सर्वात आधी पोलीस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करा. जर पोलीस ऐकत नसतील तर त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करा.
3 पोलीस निरीक्षक (पीआय), पोलीस अधीक्षक (एसपी) किंवा जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त (कमिशनर ऑफ पोलीस) यांच्याकडे लेखी तक्रार करा.
4 याशिवाय, अनेक राज्यांमध्ये राज्य पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा पोलीस नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) या ठिकाणी तक्रार नोंदवता येऊ शकते.
5 तसेच, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) व 190 नुसार, तुम्ही न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश मिळवू शकता.