
पासपोर्ट हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पासपोर्टमध्ये झालेली एक चूकही महागात पडू शकते. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
जर तुम्हाला पासपोर्टमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील.
तुम्हाला यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला काय दुरुस्त करायचे आहे ते सांगावं लागेल. जे दुरुस्त करायचे आहे, त्यासंबंधित एक डॉक्युमेंट द्यावे लागेल.
या ठिकाणीच तुम्हाला अपॉइंटमेंटचाही पर्याय मिळेल. एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तिथे जाऊन तुमच्या कागदपत्राची प्रिंट आऊट द्यावी लागेल.
यानंतर, एक महिन्याच्या आत, तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचेल, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला शुल्कदेखील भरावे लागेल.