असं झालं तर… व्हिसा हरवला तर…

कोणत्याही एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा आवश्यक आहे. जर व्हिसा नसेल तर तुम्ही परदेशवारी करू शकत नाही.

जर तुमचा व्हिसा हरवला तर फार चिंता करण्याची गरज नाही. सर्वात आधी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्हिसा चोरीला गेल्याची तक्रार करा.

ज्या देशाचा व्हिसा आहे. त्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधा. व्हिसा बदलण्यासाठी अर्ज करा. पासपोर्ट आणि हरवलेल्या व्हिसाचे तपशील द्या.

व्हिसाची वैधता तपासून घ्या. कारण, व्हिसा हरवला तरी तो वैध असू शकतो. जर तुमचा पासपोर्ट हरवला असेल तर नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा.

व्हिसा हरवल्याने तुमचा ठरलेला प्रवास थांबू शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर नवीन व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करा.