असं झालं तर… तुमच्या जीमेलचा स्टोरेज संपला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gmail

गुगलकडून 15 जीबीपर्यंत साठवण क्षमता मोफत मिळते. ती आजकाल अपुरी पडत आहे. आवश्यक ईमेल न गमावता गुगल स्टोरेज रिकामे करता येते.

गुगलच्या स्टोरेज मॅनेजरमध्ये जा.  सर्वप्रथम ट्रश आणि स्पॅम ईमेल रिकामे करा. त्यानंतर लार्ज अटॅचमेंट असलेले जुने अनावश्यक ईमेल डिलीट करा.

older_than:2y असे जीमेलच्या सर्चमध्ये टाका. तेथे 2 वर्षे जुने ईमेल दिसतील. येथे 3,4,5… असे आकडे बदलून तेवढे वर्ष जुने ईमेल डिलीट करा.

गुगल फोटो आणि गुगल ड्राईव्हमधील अनावश्यक फोटो, व्हिडीओ किंवा इतर मोठय़ा फाईल्स डिलीट करा. यामुळे मोठय़ा प्रमाणात स्टोरेज उपलब्ध होईल.

नवे जीमेल खाते तयार करा. तेथे सर्व ईमेल्सचा बॅकअप घ्या. आणि ते नव्या खात्यात डेटा ट्रान्सफर करा. ही बॅकअप फाईल संगणकावर डाऊनलोड देखील करता येते.