
n बऱ्याचदा काही महिलांच्या कानाचे छिद्र मोठे होते. त्यामुळे त्यांना ते कमी करायचे असते. कानाचे छिद्र जास्त मोठे झाले नसेल तर काही महिन्यांसाठी कानात काहीही घालू नका. त्यामुळे ते छिद्र हळूहळू नैसर्गिकरित्या कमी होते. नेहमी जड कानातले घातले तर छिद्र मोठे होऊ शकते. त्यामुळे जड वजनाचे कानातले घालणे टाळावे.
n कानातले छिद्र जर खूपच मोठे झाले असेल तर त्याला कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यावर शस्त्रक्रिया करणे होय. या प्रक्रियेला इअरलोब दुरुस्ती शस्त्रक्रिया म्हणतात. भूल दिल्यानंतर, सर्जन छिद्राचा भाग टाक्यांनी बंद करतात. एक आठवडा झाल्यानंतर टाके काढले जातात. कानातले छिद्र बरे झाल्यानंतर, एक महिन्यानंतर नवीन कानातले घातले जाऊ शकतात.