व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करणारा अटकेत

579

व्हॉटस्ऍपवर महिलेला व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करणाऱ्याला वाकोला पोलिसांनी अटक केली. छेलूराम अयोध्याप्रसाद कोरी असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

तक्रारदार या गृहिणी आहेत. गेल्या वर्षी त्या सांताक्रुझ येथे नातेवाईकांकडे राहण्यास आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात त्यांना मोबाईलवर एक मिस कॉल आला. त्यानंतर व्हॉटस्ऍपवर एक व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉल करणारा हा अश्लील कृत्य करत होता. त्यामुळे तक्रारदार यांनी फोन कट केला. त्यानंतर कोरीने त्यांना 10 वेळा व्हिडीओ कॉल केला. घडल्याप्रकरणी त्यांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

नातेवाईकांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. पोलिसांनी कौशल्याचा वापर करत काही माहिती गोळा केली. फोन करणारा हा मीरा रोड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी कोरीला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.

आपली प्रतिक्रिया द्या