
लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. आता डेस्कटॉप व्हर्जनसाठी कंपनी ग्लोबल ऑडीओ प्लेअर फीचर आणत आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्स त्याच चॅट विंडोमध्ये असताना व्हॉइस प्लेयरला थांबवू किंवा प्ले करू शकत होते. नवीन अपडेटमुळे युजरला व्हॉइस मेसेज ऐकताना चॅटदरम्यान इतर गोष्टी करण्याची परवानगीदेखील देणार आहे. म्हणजेच व्हॉइस मेसेज ऐकताना युजर दुसऱ्या विंडोवर जाऊ शकतात. हे वैशिष्टय़ सध्या बीटामध्ये आणले असले तरी लवकरच तुमच्या डेस्कटॉप ऑप्लिकेशनवर आणले जाईल.


























































