व्हॉट्सअॅपमध्ये आलंय हे नवीन फीचर, तुमच्याकडे आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणतं. काही दिवसांपूर्वी नको असलेल्या नंबरचे स्टेट्स हाईड करून ठेवण्यासाठी एक नवीन फीचर आणलं होतं. आता वापरकर्त्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे.

व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन 2.19.120मध्ये चॅट स्क्रीनमध्ये बदल करण्यात आले असून आता व्हॉट्सअॅप कॉलिंग दरम्यानही कॉल वेटिंगचा पर्याय या व्हर्जनमध्ये उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या माध्यमातून फोनवर व्हॉट्सअॅप ऑडियो कॉलिंग दरम्यान तुमच्या फोन क्रमांकावर आलेला दुसरा कॉल उचलणं शक्य होणार आहे. रेंजमध्ये येणारे अडथळे नको म्हणून बऱ्याचदा व्हॉट्सअॅप कॉलिंग सुविधा वापरली जाते. मात्र, तिथेही कॉल वेटिंगचा पर्याय आल्याने एक कॉल होल्डवर ठेवून दुसरा कॉल उचलता येऊ शकेल.

या अपडेटची साईज 85 एमबी इतकी असून हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. सध्या हे अपडेट आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून लवकर अँड्रॉईड फोनसाठीही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.