तर व्हॉट्सऍप होणार बंद, कंपनीने दिली माहिती

2217
whatsapp

हल्ली व्हॉट्सऍप आता प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. जगात सर्वाधिक व्हॉट्सऍप युजर्स हे हिंदुस्थानमध्ये आहेत. परंतु आता काही फोन्समध्ये व्हॉट्सऍप बंद होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सऍपची मालकी असलेल्या फेसबुकने तशी अधिकृतरित्या माहिती दिली आहे. फेसबुकने सांगितले की 1 फेब्रुवारी 2020 पासून अनेक मोबाईलवर व्हॉट्सऍप बंद होणार आहे.

या मागे सुरक्षेचे कारण कंपनीने दिले आहे. कंपनीने हे पाऊल उचलल्यास अँड्रॉईड आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवरील स्मार्टफोनवर व्हॉटसऍप बंद होईल.

हिंदुस्थानमध्ये बहुतांश मोबाईल धारकांकडे अँड्रॉईड फोन असतात. तर पाश्चात्य देशांमध्ये आयफोन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. जर तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईडचे जिंजरब्रेड वर्जन असेल तर फेब्रुवारीपासून व्हॉटसऍप बंद होणार आहे. तसेच जर तुमच्याकडे जिंजरब्रेड वर्जनचा मोबाईल असेल आणि तुम्ही त्यात व्हॉटसऍप इन्स्टॉल केले तर तुमचे अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे. 10 वर्षापूर्वी अँड्रॉईडने जिंजरब्रेड वर्जन आणले होते. जर तुमच्याकडे सॅसमसंग, सोनी किंवा गूगलचा फोन असेल तर आणि त्यात जिंजरब्रेड असेल तर काहींना चिंता करण्याची गरज नाही कारण त्यात व्हॉटसऍप सुरू राहील.

आयओएस च्या 8 वे वर्जन आणि त्या आधीच्या वर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सऍप बंद होणार आहे. त्याच अर्थ ज्यांच्याकडे आयफोन ६किंवा त्याच्या पुढचा वर्जन आहे त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. चांगल्या सुविधेसाठी आयफोन धारकांनी आपले वर्जन अपडेट करावे असे आवाहन फेसबुकने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या