19 व 20 एप्रिलला डब्ल्यूडब्ल्यूआयची प्रवेश परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हिसलिंग वुडस् इंटरनॅशनलने (डब्ल्यूडब्ल्यूआय) जुलै 2022 च्या प्रवेशासाठी एप्रिलमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तारखा घोषित केल्या आहेत. डब्ल्यूडब्ल्यूआय स्कूल्स ऑफ फिल्ममेकिंग, क्रिएटिव्ह आर्ट्स, मीडिया मॅनेजमेंट अॅण्ड परफॉर्मिंग आर्ट्सच्या अनेक वेगवेगळ्या पूर्ण वेळ पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी इच्छुक व्यक्ती अर्ज करू शकतात. प्रवेश परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून नावनोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 19 व 20 एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www. whistlingwoods.net या वेबसाईटवर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावेत.