
निर्सगाने आपल्यासाठी भरभरून फळांचा खजिना दिलेला आहे. त्यातील पपई हे फळ अनेक व्याधींवर आणि रोगांवर रामबाण इलाज मानले जाते. आयुर्वेदात पपईला ‘अमृतफळ’ असं म्हणतात कारण पपईचा प्रत्येक भाग, फळं, पानं आणि बियांमधे अनेक गुणधर्म असतात. तापातून बरं करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचा सुधारण्याची शक्ती पपईमधे आहे.
दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल
फलाहार म्हणजे निसर्गानं दिलेलं औषध. कारण फळ शरीराच्या अंतर्बाह्य पोषणासाठी अत्यंत महत्त्वाची. आरोग्यासाठी फायदेशीर फळांचा विचार केला तर पपईचा क्रमांक सगळ्यात वरचा. आयुर्वेदात याला ‘अमृतफळ’ असं म्हणतात कारण पपईचा प्रत्येक भाग, फळं, पानं आणि बियांमधे अनेक गुणधर्म असतात. तापातून बरं करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचा सुधारण्याची शक्ती पपई ह्या अमृतफळामधे आहे. पपई आणि त्याच्या पानांमधे तिन्ही दोष संतुलित करण्याची आणि पचन सुधारण्याची शक्ती आहे.
डिटॉक्स म्हणजे नेमके काय? याकरता कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करायला हवा
पपई हे सर्व ऋतूंमधे सहज उपलब्ध असलेलं फळ आहे आणि त्यातले एंझाइम, पपेन हे घटक पोट आणि आतड्यांसाठी फायदेशीर आहेत. पचन सुधारण्यात, शरीर शुद्ध करण्यात आणि पोषक घटक शोषण्यासाठी हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत. त्याची पानं आणि बियांमधे औषधाप्रमाणे गुणधर्म आहेत.
केवळ पपईच नाही तर त्याची पानं आणि बिया देखील फायदेशीर आहेत आणि आयुर्वेदात औषध म्हणून वापरली जातात. पानं आणि बिया चवीला थोडी कडू असली तरी ते शरीराच्या अनेक समस्या मुळापासून बऱ्या करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरात येणारे जायफळ आरोग्यासाठीही तितकेच उपयुक्त, वाचा
त्वचेच्या समस्या असतील तर पपईची पेस्ट खाणं आणि लावणं दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी, पपईच्या लगद्यामधे मध मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा. त्वचा घट्ट करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवर चांगली चमक येते.
तापावर उपचार करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. तापामुळे अशक्तपणा जाणवतो. रक्तातील अशुद्धता वाढली असेल किंवा प्लेटलेट्स कमी झाले असतील तर पपईची पानं पाण्यात उकळून पिणं फायदेशीर आहे. पानांपासून बनवलेला काढा रक्त शुद्ध करतो आणि विविध आजार कमी करण्यास मदत करतो.
आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील
ताप किंवा संसर्गानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास दररोज पपई खाणं फायदेशीर आहे. पपईतील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या पानांचा रस पिणंही तब्येतीसाठी आवश्यक आहे.
केस गळतीचा त्रास होत असेल किंवा केस गळत असतील तर पपईच्या बियांच्या पेस्टनं केस मजबूत होऊ शकतात आणि कोरडेपणा दूर होऊ शकतो.

























































