
भाजप आणीबाणीपेक्षा वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त असतील तर आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते, माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. हे पाहून सर्वसामान्य माणसांना किती वेदना होत असतील याची कुणालाही कल्पना नाही. सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे असे बच्चू कडू म्हणाले.


























































