पाकिस्तानला नावं ठेवणाऱ्यांना दस पट शिव्या घालू, अकबर लोन यांचं वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nc-leader-akbar-lone

सामना ऑनलाईन । कुपवाडा

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी पाकिस्तानचे गुणगान गात त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना शिव्या घालू असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या विधानामुळे निवडणुकीच्या काळात वातावरण आणखी तापणार असे चित्र आहे.

‘याच्या दुसऱ्या बाजूला इस्लामिक देश आहे, त्याची भरभराट व्हावी आणि यशही मिळावे. त्यांच्यासोबतची आपली मैत्री अधिक घट्ट व्हावी. हिंदुस्थान आणि पाकिस्तानची एकमेकांसोबत मैत्री व्हावी आणि त्याचा प्रशंसक असेल. या मैत्रीवरून कोणी त्याला वाईट बोलले तर मी त्यांना दसपट अधिक शिव्या घालेन, असे त्यांनी एका सभेत बोलताना सांगितले. लोन हे कुपवाडामधून नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभेचे उमेदावर घोषित करण्यात आले आहेत. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणारा सुर आळवला आहे. याआधी देखील त्यांनी कश्मिरी जनतेच्या भावना भडकवणारे अशी विधाने केली होती.