हायड्रोजनपासून वीजनिर्मिती करणार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारंपरिक इंधनापासून वीजनिर्मितीवर आम्ही आजवर केंद्रित होतो. आता आम्ही हायड्रोजनपासून वीजनिर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. अशाप्रकारे वीजनिर्मितीचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात होईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन परिषदेत केली.

राज्यभर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्ंजगसाठी अनेक ठिकाणी चार्ंजग स्टेशन्स उभारण्यासाठी ऊर्जा विभागाने तयारी केलेली आहे. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये सुधारणा करून अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना अधिक प्रोत्साहन देईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

इलेक्ट्रिक वाहन चार्ंजग स्टेशनची लवकरच उभारणी

वाहतूक क्षेत्रातील हरित ऊर्जेचा वाढता वापर सुलभ करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चार्ंजग स्टेशन्स उभारण्यासाठी  सक्रियपणे पुढाकार घेत आहे.  महावितरणसोबतच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीने पेट्रोल पंपांच्या आवारात चार्ंजग स्टेशन्स उभारण्यासाठी पेट्रोल कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मॉडेल यशस्वी झाल्यास भविष्यात शाळांमध्ये व कॉलेजमध्ये चार्ंजग स्टेशनची संख्या वाढवण्यात येतील. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपली वाहने सहजपणे  चार्ंजग करता येईल, असे डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी दिवसाला चार्ंजगचे दर रु. 5.50 प्रति युनिट तर  रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चार्ंजगचे दर 4.50 रु. प्रति युनिट असेल. कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्याचा यामागे हेतू असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.