मुंबई-गोवा महामार्गाचे उद्घाटन करणार नाही! नितीन गडकरींचं मोठं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या बारा वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. तसेच या मार्गाची दुर्दशा झाली आहे. हे कामासाठी मेपर्यंतची वाढीव डेडलाईन होती. या रखडलेल्या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

गोवा महामार्गाच्या कामाबाबतचा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात येतो. गणेशोत्सव आणि शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. मुंबई-गोवा महामार्गानंतरचा समृद्धी महामार्ग झाला. मात्र, 12 वर्षांपासून हा महामार्ग रखडला आहे. आता या मार्गाचे 95 टक्के काम पूर्ण होत आले आहे. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, आता या महामार्गाचे आपण उद्घाटन करणार नाही. हा महामार्ग खुप जुना असून त्याला प्रचंड विलंब झाला आहे. त्यामुळे या मार्गाचे आपण उद्घाटन करणार नाही. एवढा विलंब झालेल्या महामार्गाचे उद्घाटन करण्यास आपल्याला संकोच होत आहे, असे ते म्हणाले. तसेच पुढील महिन्यात मुंबईहून गोव्यापर्यंत जाऊन आपण स्वतः या मार्गाचे परीक्षण करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.