आणखी पाच वर्षे खेळणार – गेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याचे सध्याचे वय 41 आहे. पण तरीही त्याच्यातील क्रिकेटची भूक अजून मिटलेली नाही. त्याला अजून पाच वर्षे खेळायचे आहे. त्याला पुढील दोन टी-20 वर्ल्ड कपही खेळायचे आहेत. यावेळी दस्तुरखुद्द ख्रिस गेलने आपल्याला अजून बरेच क्रिकेट खेळायचे आहे असे स्पष्ट करीत त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावला.

दुबईतील अल्टिमेटल क्रिकेट चॅलेंजदरम्यान ख्रिस गेलने आपले मत व्यक्त केले. यावेळी तो म्हणाला, सध्या निवृत्तीची कोणतीही योजना नाही. पुढील पाच वर्षे तरी क्रिकेट खेळायचे आहे. तसेच 2021 सालामध्ये हिंदुस्थानात आणि 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यामध्येही वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्यामुळे सध्या तरी निवृत्तीचा विचार डोक्यात नाहीए, असे त्याने आवर्जून सांगितले.