Video : विंग कमांडर अभिनंदन यांचे जवानांनी केले जोरदार स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्यात आलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जम्मू कश्मीरमध्ये जवानांनी जोरदार स्वागत केले आहे. अभिनंदन यांच्या स्वागताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात सर्व जवान अभिनंदन यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत.

अभिनंदन यांच्या स्वागताच्या वेळी जवानांनी दिलेल्या भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी अभिनंदन यांनी जवानांच्या कुटुंबीयांसाठी खास संदेश देखील दिला. ‘मी जवानांसोबत काढलेले फोटो हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी आहेत. माझ्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असताना तुमचे कुटुंबीयही माझ्यासाठी प्रार्थना करत होते. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो’, असे यावेळी अभिनंदन यांनी सांगितले.