
7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा प्रमुख राहणार आहे. त्यानंतर अवकाळी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या दुष्काळी स्थितीबरोबरच ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण आणि राज्य शासनाची कंत्राटी भरती हे मुद्देही गाजणार आहेत.

























































