
कोळंबे संगमेश्वर येथील रहिवासी असलेले आणि महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश रावजी भरणकर (वय 58) आपल्या सहकाऱ्यासह राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे देखभाल दुरूस्तीचे काम करत असता विज खांबावरुन खाली पडले. मात्र, त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्याना खाली पड़ताना पकडले. त्यानंतर त्यांना मिहिर गिरीष करगुटकर यांच्या वाहनाने चव्हाणवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ अष्पाक काझी यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापुर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अजित पडवळ यांनी त्यांना मृत घोषित केले.
देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी भरणकर व त्यांच्या सहकारी यांनी पडवे सबस्टेशन मधून विज प्रवाह बंद करून घेतला. त्यानंतर त्यांनी कोम्बेस्टॉप ते चव्हाणवाडी दरम्यानच्या विज खांबावर काम सुरु केले. विज खांबावर काम करीत असताना अचानक ते जोरात किंचाळले व क्षणात ते खाली कोसळले. मात्र खाली उभे असलेल्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना पकडले. वीज प्रवाह बंद असल्याने त्यांना काम करीत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ही घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 3 मुले असा परिवार आहे.

























































