ऑनलाइन साहित्य विक्री पडले महिलेला महागात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन साईडवर बेड विकणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. बेड विक्रीच्या नावाखाली ठगाने महिलेची 4 लाख 23 हजार रुपयाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार महिला या विलेपार्ले परिसरात राहतात. दोन महिन्यांपूर्वी त्या कुटुंबीयांसोबत बंगळुरू येथून मुंबईला शिफ्ट झाल्या. महिलेच्या मुलीने घरातील जुने साहित्य विक्रीसाठी पह्टो सोशल मीडियावर अपलोड केला. पह्टो अपलोड केल्यानंतर एकाने महिलेला पह्न केला. आपल्याला तो बेड विकत घ्यायचा असल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. बेडचे पैसे ऑनलाइन देऊ असे सांगून ठगाने महिलेच्या ई-वॉलेटची माहिती घेतली. विश्वास बसावा म्हणून ठगाने महिलेला सुरुवातीला 5 रुपये ऑनलाइन पाठवले.

त्यानंतर ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून पैसे काढले. बँक खात्यातून 4 लाख 23 हजार रुपये काढले गेले. पैसे गेल्याचे लक्षात येताच महिलेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.