बेशुद्धावस्थेत पडलेल्या महिलेच्या मदतीला धावली महिला पोलीस शिपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनकाळात वर्दीतल्या माणूसकीच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. त्यात आणखी एका महिला पोलीस शिपायाची भर पडली आहे. रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या आईच्या शेजारी मुलगा रडत बसलेला पाहून महिला शिपायाने त्याच्या मदतीला धावली. त्यानंतर तिने जे केले त्याने सगळ्यानाच अभिमान वाटला.

सोशल मीडियावर या घटनेचा एक फोटो तुफान व्हायरल होत असून या महिला पोलीस शिपायाने सगळ्यांकडून कौतुक होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोत एक महिला पोलीस शिपाई रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका महिलेला पाणी पाजताना दिसत आहे. हा हृदयस्पर्शी फोटो उत्तर प्रदेशातील आहे. सचिन कौशिक यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना त्याच्यावर लिहीले एक आई उकाड्याने बेशुद्ध होऊन रस्त्याच्या कडेला पडली. तिचं लहान मुलं आईची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून रडायला लागलं. त्यावेळी त्या परिसरात गस्त घालत असलेल्या रिना यांची त्या महिलेवर नजर पडली. त्यांनी तिला पाणी पाजलं. तिचा चेहरा धुतला आणि तिला शुद्ध आली. एवढेच नाही तर या महिला पोलीस शिपायाने त्या महिलेला तिच्या घरीही सोडण्याची व्यवस्था केली.

हा हृदयस्पर्शी फोटो पाहून आयपीएस अधिकारी दिपांशु छाबरा यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत रिनाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत कौतुकास्पद काम केले रिना…मी तिला सलाम करतो. पुढे ते म्हणतात की वाईट आणि हैराण करणारी गोष्ट आहे की तिथे आजुबाजुच्या लोकांना तिला मदत करावीशी वाटली नाही. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून लोक रिनाचे कौतुक करत त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत.