दीड लाखांचा iPhone ऑनलाइन मागवला, बॉक्स उघडताच तोंडाला फेस आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर भलतंच काहीतरी मिळाल्याचे प्रकार नवीन नाहीत. असाच काहीसा प्रकार यूकेमधील एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेने तब्बल दीड लाख रुपये किंमतीचा iPhone 13 Pro Max ई-कॉमर्स वेबसाईटवरून ऑर्डर केला होता. पण या फोनच्या जागी महिलेने पॅकिंग बॉक्समध्ये 100 रुपये किंमतीचा हात धु्ण्याचा साबण मिळाला आहे.

यूएकमद्ये राहणाऱ्या Khaoula Lafhaily या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेने एका प्रसिद्ध स्थानिक ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून iPhone 13 Pro Max बूक केला होता. काही दिवस वाट पाहिल्यानंतर तिला संबंधिक ई-कॉमर्स कंपनीकडून एक पॅकिंग पार्सल स्वरुपात मिळाले. बॉक्स खोलून पाहताच आयफोन मिळाल्याच्या आनंदावर विरजण पडले. पॅकिंग बॉक्समध्ये एक हात धुण्याचा साबण पाहुन महिलेला धक्काच बसला.

असाच प्रकार हिंदुस्थानातील केरळमधीलल एका तरुणासोबतही घडला होता. या तरुणाने ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून Apple कंपनीचा iPhone 12 ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये तरुणाला एक धुण्याचा साबण आणि 5 रुपयांचा ठोकसा मिळाला होता.

दरम्यान, AppleInsider ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने याबाबत खुलासा केला असून डिलिव्हरी दरम्यान हा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. पीडित तरुणीने स्काईमोबाईलच्या माध्यमातून 36 महिन्यांच्या हप्तेतत्वावर iPhone 13 Pro Max खरेदी केला होता. डिलिव्हरीसाठी दुसऱ्या दिवशीची तारीखही दिली होती. परंतु पीडितेला आयफोन दोन दिवसांनंतर मिळाला. डिलिव्हरी करणाऱ्याने कर्मचाऱ्याने आपण ट्राफिमध्ये अडकल्याचे कारण दिले होते आणि या काळातच पॅकिंग बॉक्समधून आयफोन काढून त्यात साबण ठेवण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे डिलिव्हरी बॉयने आपल्याला प्रत्यक्ष भेटून पार्सल दिले नाही असा दावाही तरुणीने केला आहे. डिलिव्हरी बॉयने आपल्या बंद घराचा फोटो काढला आणि पार्सल ठेऊन निघून गेला असे तरुणीने म्हटले. तो आला तेव्हा आपण घरीच होतो असेही तरुणीने सांगितले. डिलिव्हरी बॉयने दरवाजा ठोठावला नाही आणि तो निघून गेल्याचे तरुणीने म्हटले. त्यानंतर आपण बॉक्स खोलला तेव्हा त्यात साबण असल्याचे स्पष्ट झाले आणि आपण तात्काळ स्काईमोबाईलवर तक्रार दाखल केल्याचे तरुणीने सांगितले. या प्रकरणी चौकसी करून प्रतिक्रिया देऊ असे कंपनीने म्हटले आहे.